महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जर निर्बंध उठवले नाही, तर सरकारला परिणाम भोगावे लागतील; मनसेचा इशारा - कोरोन नियमांवरून मनसेचा राज्य सरकारला इशारा

राज्य सरकारच्या धोरणावर मनसेने टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे.

sandeep deshpande
जर निर्बंध उठवले नाही, तर सरकारला परिणाम भोगावे लागतील

By

Published : Jul 15, 2021, 5:24 PM IST

मुंबई -कोरानाची दुसरी लाट ओसरत असली, तरी अजूनही निर्बंध कायम आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. सरकारच्या या धोरणावर मनसेने टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. जर निर्बंध उठवले नाहीत, तर त्याचे परिणाम हे सरकारला भोगावे लागतील, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना निर्बंधातून बाहेर काढावे, ही आमची मागणी आहे. लसीकरण पूर्ण होऊन सुद्धा जर निर्बंध लागू असतील, तर मग लसीकरणाचा फायदा काय, असा प्रश्नही देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. सरकारला जनतेचे काही देणे-घेणे नसून सरकारच्या या धोरणांमुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पुढील काळात सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

व्यापाऱ्यांच्याही राज्य सरकारला इशारा -

शनिवार आणि रविवार दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी व्यापारी संघटनेची मुख्य मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास, या शनिवार आणि रविवारीसुद्धा सुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला होता. नियमांमध्ये शिथिलता न मिळाल्यास मुंबई महानगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालू, असा इशाराही व्यापारी संघटनांनी सरकराला दिला आहे.

यापूर्वीही मनसेने केला होता विरोध -

राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दुकाने, आस्थापने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. मात्र, मुंबईतील काही भागात सायंकाळी ४ नंतरही काही दुकाने खुलेआम सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यांनी सरकारवर गंभीर टीका केली आहे. 'आधी वसुली बार मालकांकडून…. आता वसुली व्यापाऱ्यांकडून' अशा शब्दांत देशपांडे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

हेही वाचा - अहो, ऐकलं का? केवळ ५०० रुपयांत लग्न, SDO आणि लष्करातील मेजरचा समाजासमोर आदर्श

ABOUT THE AUTHOR

...view details