मुंबई:नागालॅंडमध्ये त्यांच्या पाच जागांवर राकॉं दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जिंकले आहेत. दोन्ही पक्षाने एकत्रितरीत्या या निवडणुका लढवत बहुमत मिळविले आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीत तेथील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली. रवींद्र धांगेकर यांना विजयी करत कसबा पेठ मतदारसंघातील जनतेने लोकशाही स्वीकारले असल्याचा चिमटा भारतीय जनता पक्षाला रोहित पवार यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमाची संवाद साधताना काढला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांचा पराजय झाला. मात्र झालेल्या बंडखोरीमुळे हा पराजय झाला आहे. तो राहुल कलाटे यांना जवळपास 40 हजार मते मिळाली. मात्र ही चाळीस हजार मते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतदानापेक्षा कमी आहेत. एकत्रित रित्या पिंपरी चिंचवड येथीलही निवडणूक लढली असती तर विजय महाविकास आघाडी च्या उमेदवाराचा असता असेही मत रोहित पवार यांनी व्यक्त केल आहे.
पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना सोयी द्या:मुंबईत होणाऱ्या पोलीस भरतीसाठी 5 हजार जागांसाठी आठ लाख उमेदवार झाले आहेत. रात्रभर प्रवास करून पहाटेच शारीरिक चाचणी देण्यासाठी उमेदवारांना मैदानात उतरावे लागत असल्याने त्यांचा रात्रभर व्यवस्थित आराम होत नाही. त्यामुळे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची आणि खाण्याची सोय व्हावी, यासाठी आपण सभागृहात मुद्दा मांडला होता. यावर राज्य सरकारने सकारात्मक उत्तर देऊन अशा उमेदवारांची राहण्याची सोय केली जाणार असल्याचे आश्वासन दिल असल्याचं रोहित पवारांनी सांगितला आहे.
निलेश राणे यांच्यावर टीकास्त्र:नारायण राणे यांना वांद्रे येथील पोट निवडणुकीत शिवसेनेच्या महिला उमेदवारांनी हरवल असल्याची उपहासात्मक टीका अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड येथे अश्विनी जगताप यांचा विजय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या बाबत वादग्रस्त ट्विट केला आहे. मात्र केवळ आपल्या ट्विट वरून बातम्या व्हाव्यात यासाठी निलेश राणे अशा प्रकारचे ट्विट करतात निलेश राणे यांची राजकीय वैचारिक पातळी अत्यंत खालची आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपण बोलणं योग्य नाही असा टोला रोहित पवार यांनी निलेश राणे यांना लगावला आहे.