महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLAs Disqualification : सेनेचे 16 आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल; जयंत पाटलांचे विधान, अजितदादांचे गणित मात्र वेगळेच

शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र प्रकरणावरून सध्या राजकारण जोरात सुरू आहे. अपात्रतेवरून मात्र महाविकास आघाडीतच वेगवेगळे सूर उमटताना दिसून येत आहेत. 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे सरकार नक्कीच पडेल, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. तर 16 आमदार अपात्र झाले तरी हे सरकार टिकेल, असे विधान अजित पवार यांनी सोमवारी केले होते.

MLAs Disqualification
शिंदे सरकार कोसळणार

By

Published : May 16, 2023, 7:12 PM IST

Updated : May 16, 2023, 9:36 PM IST

अजित पवारांचे विधान

मुंबई - 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे सरकार नक्कीच पडेल, असे वाटते. त्यामुळे शिंदे गटासह उर्वरित आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. भाजप हा संख्येने सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपाल त्यांच्याशी संपर्क साधतील आणि त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर ते सरकार स्थापन करू शकतील अशीही शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे सरकार नक्कीच पडेल, असे वाटते. त्यामुळे शिंदे गटासह उर्वरित आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे - जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष

सरकारला धोका नाही - राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला फटकारले होते. राज्यातील सरकार हे बेकायदेशीर असल्याचा टोला देखील अप्रत्यक्ष लगावला होता. आमदार अपात्रतेबाबतचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. यावर सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. 16 आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नसल्याचे ते म्हणाले होते. एकीकडे ठाकरे गट 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी जोर धरत आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या या विधानाने नवीन राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

288 आमदारांपैकी जर समजा 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. तर, पण वेगळा निकाल लागणार नाही. जरी तो लागला तरी सरकारच्या बहुमतावर काहीच परिणाम होत नाही. कारण 16 आमदार अपात्र झाले तर आमदारांची संख्या 272 होईल. आणि बहुमताला जी संख्या हवी आहे, तो आकडा सत्ताधाऱ्यांकडे आहे - अजित पवार, विरोधी पक्षनेते

आमदारांची बेरीज-वजाबाकी

लवकर कारवाई करावी : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट हे अॅक्शन मोडमध्ये आले असून 16 आमदारांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आहे. आमदारांवर कारवाई झाली तर राज्यातील सरकार कोसळेल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी मात्र सरकारची चिंता मिटवणारे विधान केले होते.

ठाकरे गटाची मागणी : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पत्राद्वारे विनंती केली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि याबाबत निर्माण झालेला तिढा सोडवावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी केली होती.

आमदारांची बेरीज-वजाबाकी

16 आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा. या प्रकरणाबाबत त्यांनी विलंब करू नये - सुनील प्रभू, ठाकरे गटाचे नेते

महाविकास आघाडीत वेगवेगळी मते - शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरवणे हा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. या मुद्द्यावरून रोज वेगवेगळे विधाने समोर येत आहेत. शिंदे, फडणवीस यांच्याकडून यावर कमी प्रमाणात भाष्य केले जाते. मात्र, महाविकास आघाडीतीन वरिष्ठ नेते या प्रकरणावर रोजच आपली प्रतिक्रिया देत आहेत. 16 आमदार अपात्र झाले तरी सरकार टिकेल, असे विधान अजित पवार यांनी सोमवारी केले होते. तर 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार नक्की पडेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 16 आमदार अपात्रतेचा निर्णय लवकर घ्यावा यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच एकमत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी व प्रतोदबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल - राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

दबावाला बळी पडणार नाही - अपात्रतेच्या विषयावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याच्या नियमानुसारच अपात्रतेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसून, याबाबतच निर्णय लवकरच घेणार आहे. आधी पक्ष कोणाचा याबाबतचा निर्णय होईल आणि नंतरच प्रतोदबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर यावेळी म्हणाले.

आमदारांची बेरीज-वजाबाकी

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on MLAs Disqualified : सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत
  2. Ajit Pawar On Loksabha Election: लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता- अजित पवार
  3. Sharad Pawar for MVA Stronger : महाविकास आघाडी मजबुतीसाठी शरद पवारांची हाक; कोर्टाच्या निर्णयानंतर पवारांचा सूर वाढला
Last Updated : May 16, 2023, 9:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details