महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आयसीआयसीआय बँक व्हिडीओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने चंदा कोचर, दीपक कोचर आणि व्ही एन धुत यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. कोचर दाम्पत वेणूगोपाल धूत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ( ICICI bank Videocon loan fraud ) ( Chanda Kocchar Deepak Kochhar ) ( V N Dhoot ) कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

चंदा कोचर
चंदा कोचर

By

Published : Dec 29, 2022, 1:12 PM IST

Updated : Dec 29, 2022, 1:39 PM IST

मुंबई -कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत यांना विशेष सीबीआय कोर्टात ( ICICI bank Videocon loan fraud ) हजर केले होते. तिन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी देण्याची सीबीआयची कोर्टासमोर विनंती करण्यात आली. कोर्टाने तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ( 14 day judicial custody ) दिली.

व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा : 2009 मध्ये 300 कोटी रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा ( 300 crore Videocon loan scam ) प्रकरणात दोघांना अटक झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. मुंबई सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. ईडीकडूनही याप्रकरणी चौकशी सुरू असून सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ही अटक झाली होती. व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मोठा हादरा बसला असून सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

सीबीआयकडून चौकशी :चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( former CEO ICICI Bank Chanda Kochhar ) असताना बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज दिले गेले होते. यातील 2 हजार 810 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते आणि 2017 मध्ये ते बुडीत कर्ज म्हणून जाहीर केले गेले होते. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली. चंदा कोचर यांनी बँकेचे धोरण आणि नियम मोडून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉनचे एक भागधारक अरविंद गुप्ता यांनी याबाबत पत्र लिहून पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे तक्रार केली होती. 1984 मध्ये ट्रेनी व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय बँकेत रुजू झालेल्या चंदा कोचर यांचा यशाचा आलेख चढता राहिला. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट बिझनेस हेड, मुख्य वित्त अधिकारी अशा विविध पदांवर काम केल्यानंतर 2009 मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक बनल्या.

Last Updated : Dec 29, 2022, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details