मुंबई -कोरोना विषाणूच्या संकटाच्या निवारणासाठी राज्यातील ‘द आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आली. संघटनेच्या खजिनदार नीतू प्रसाद आणि सचिव डॉ. राखी गुप्ता यांनी यासाठीचा धनादेश राज्याचे गृह आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे सुपूर्द केला.
'आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन'मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १.७५ लाखांची मदत - corona effect
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता त्याला आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाला मदतीचा हात म्हणून ‘द आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांचा निधी देण्यात आली.
राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या पत्नींची ही संघटना असून विविध सामाजिक कार्यात ही संघटना सहभागी असते. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशातील सर्व राज्यांमध्ये झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणे, गोरगरीब मजूर, स्थलांतरीत कामगार यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे, सर्व ठिकाणांची स्वच्छता करुन जंतूनाशकांची फवारणी करणे यांसारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून एक जबाबदारी म्हणून 'द आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन'मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यात आली.