महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shared An Inspiring Post : आयएएस अधिकाऱ्याने शेअर केली रस्त्यावरील दिव्यांग विक्रेत्याची प्रेरणादायी पोस्ट - street vendor

आएएस अधिकारी सोनल गोयल (IAS officer Sonal Goyal) यांनी असेच एक प्रेरणादाई ट्विट शेअर (Shared An Inspiring Post) केले आहे. यात मुंबईच्या रस्त्यावर एक हात नसलेला विक्रेता (street vendor) पावभाजी करताना दिसत आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकटे असतात. अनेकजन आपल्या कतृत्वाने अशा संकटावर मात करत चरीतार्थ चालवताना जगासाठीही आदर्श निर्माण करतात.

Divyang Vendor
दिव्यांग विक्रेता

By

Published : May 18, 2022, 7:32 PM IST

मुंबई:आएएस अधिकारी सोनल गोयल ((IAS officer Sonal Goyal)) यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरुन दोन व्हिडीओ पोष्ट केले आहेत. यात मितेश गुप्ता नावाचा एक दिव्यांग व्यक्ती रस्त्यावरील फूड स्टाॅलवर सगळे काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो एका हाताने सफाईने भाजी कापतो तसेच पावभाजीही बनवताना दिसत आहे. तो मोठ्या शिताफीने सगळी कामे करताना पहायला मिळत आहे. स्वत:चे रेस्टाॅरंट उघडण्याचे स्वप्न उराशी घेउन मोठ्या आनंदाने तो हे काम करताना पहायला मिळत आहे.

अधिकारी सोनल गोयल यांनी हिंदीत हे ट्विट केले आहे यात म्हणले आहेकी, “मेरी मुश्कीलो से कह दो, मेरा खुदा बडा है,” "काही वर्षांपूर्वी एका अपघातात दुर्दैवाने आपला हात गमावलेला मितेश गुप्ता आजही मुंबईतील मालाडमध्ये आपला पाओभाजी स्टॉल पूर्ण उत्साहाने चालवतो"

ABOUT THE AUTHOR

...view details