मुंबईSharmila Thackeray On Aaditya Thackeray : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या सचिव दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पोलिसांचं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आलं आहे. यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली. या चौकशीमुळं आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून भाजपा नेते आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. तर, आदित्य ठाकरे यांच्या बचावासाठी त्यांच्या काकू शर्मिला ठाकरे मदतीला धावून आल्या आहेत. या प्रकणावर बोलताना त्या म्हणाल्या की, 'आदित्य ठाकरे असं काही करेल असं वाटत नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अशा चौकशीतून आम्हीही गेलो :मनसेच्या स्वयंरोजगार विभागातर्फे 'उद्योग कर उद्योग' या विशेष कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे. उद्योग, व्यापारात महिलांना प्रोत्साहन देणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे असं काही करेल असं वाटत नाही. अशा चौकशीतून आम्हीही गेलो आहोत, असं त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितलं.