मुंबई- शहरातील डोंगरी परिसरात इमारत कोसळल्याची घटना आज घडली आहे. निषणपडा अब्दुल रेहमान शहा दर्ग्याच्या मागे हीइमारत होती. केसरबाई असे या कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. यात ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आधीही मुंबईत इमारती कोसळल्या होत्या. याबाबतचा आढावा
*२०१३ साली मुंबईतील माझगाव भागामध्ये ४ मजली इमारत कोसळली होती. यामध्ये ६१ लोकांना जीव गमवावा लागला होता, तर ३२ जण जखमी झाले होते.
*२०१३ साली ठाण्यामध्ये इमारत कोसळून ७४ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १८ मुलांचा आणि २३ महिलांचा समावेश होता.
*२००७ साली मुंबईतील बोरीवली परिसरात लक्ष्मी छाया नावाची इमारत कोसळली. यामध्ये तीस जणांचा मृत्यू झाला. अनधिकृत बांधकामाचा प्रयत्न करण्यात आल्याने ही इमारत कोसळली.