मुंबई - लॉकडाऊनमुळे घरविक्रीत मोठी घट झाल्याची ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र लॉकडाऊनमध्ये घरविक्री जोरात झाल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 252 कोटी रुपयांच्या घराची विक्री झाली असून यात विक्री झालेल्या 240 घरांच्या समावेश आहे.
लॉकडाऊनच्या काळातही घरविक्री जोरात, एकूण २५२ कोटींची घरविक्री
अॅनरॉक या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालानुसार, लॉकडाऊनचा काळ देखील बांधकाम खरेदी-विक्रीसाठी दिलासादायक राहिला आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून प्रत्यक्ष साइट व्हिजिट बंद असली, तरी ऑनलाईन साईट व्हिजिटच्या माध्यमातून मोठ्या संख्येने घरविक्री झाल्याची माहिती अॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली आहे.
अॅनरॉक या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालानुसार, लॉकडाऊनचा काळ देखील बांधकाम खरेदी-विक्रीसाठी दिलासादायक राहिला आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून प्रत्यक्ष साइट व्हिजिट बंद असली, तरी ऑनलाईन साईट व्हिजिटच्या माध्यमातून मोठ्या संख्येने घरविक्री झाल्याची माहिती अॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली आहे. बांधकाम कंपन्यानी कल्पकता लढवत ग्राहकांना ऑनलाईन साईट व्हिजिटकडे वळवले आणि त्याचा चांगला फायदा झाल्याचे चित्र आहे.
अॅनरॉकच्या अहवालानुसार, देशात 252 कोटींची घरविक्री झाली आहे. यात 240 घरांची, तर 62 व्यावसायिक जागेची विक्री आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाने देशात सर्वाधिक हाहाकार जिथे माजवला आहे, त्याच मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात सर्वाधिक 85 कोटी रुपयांची घरे विकली गेली आहेत. 70 लाख ते दीड कोटीच्या घरातील ही घरे आहेत. या व्यवहारामुळे बांधकाम व्यावसायिक मात्र नक्कीच सुखावले असतील.