मुंबई - अहमदनगर अत्याचार प्रकरणातील पीडितेला आणि तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी आजच्या आज उत्तर द्यावे. आरोपींना लवकरात-लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पीडितेला मारहाण करणाऱ्यांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. न्याय मिळवून देण्याऐवजी अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत. राज्याचे पोलीस खाते करते काय, असा प्रश्न फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला. या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांना निलंबित करावे. इतर आरोपींनाही लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.