महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Home Minister appeals : गृहमंत्र्यांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायांना केले शांतता राखण्याचे आवाहन - r appeals to Hindu and Muslim communities to maintain peace

औरंगाबादमधे होत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या सभेच्या पार्श्वभुमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी राज्यातील जनतेला विशेषत: हिंदू आणि मुस्लिम समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन (r appeals to Hindu and Muslim communities to maintain peace) केले आहे.

Dilip Walse Patil
दिलीप वळसे पाटील

By

Published : May 1, 2022, 11:20 AM IST

मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्षराज ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमके काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मशिदीवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. हे भोंगे राज्य सरकारने उतरवले नाही तर त्याच मशिदीसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा( Hanuman Chalisa Row ) पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे.

राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभुमीवर बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हणले आहे की, महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत. रॅलीसाठी काही अटी व शर्तींनी परवानगी देण्यात आली आहे. त्या अटींचे पालन केले जावे अशी आमची अपेक्षा आहे. मी हिंदू आणि मुस्लिम समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.

ABOUT THE AUTHOR

...view details