मुंबई- कोरेगाव भीमा बाबतीत चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा उद्या (दि. 22 जानेवारी) सकाळी आठ वाजता आढावा घेणार आहोत. त्यानंतर चौकशी समितीकडून उद्या सकाळी पूर्ण अहवाल मांडला जाईल. त्यानंतरची पुढची कारवाई राज्य सरकार करेल आणि पुढचा निर्णय होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्रीमंडळ बैठकीच्या नंतर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत 24 तास सुरू राहणाऱ्या मौलानी हॉटेलच्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेची कुठेही अडचण येणार नाही, अशी माहिती दिली. तसेच एनआरसी आणि सीएए संदर्भात 'गेट वे'वर विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालू होत त्यात ज्या विद्यार्थिनीने पोस्टर दाखवले होते, त्या पोस्टरच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. जे पोस्टर दाखवले त्यामागे तिची भावना ही चांगली असेल तर तिच्यावर कारवाई होणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.