मुंबई - शहराच्या कानाकोपऱ्यात आज मोठ्या उत्साहात होळी आणि धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईतील होळी ही प्रसिद्ध असून अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि खेळाडू यात सहभागी होतात. त्यामुळे मुंबईच्या होळीकडे अनेकांचे लक्ष असते.
मुंबईत होळी आणि धुळवडीचा सण उत्साहात साजरा - धुळवड
मुंबईत आज होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यंदा महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे प्रशासनाने कोरडी होळी खेळण्याचे आव्हान नागरिकांना केले होते. त्यामुळे मुंबईकरांनी सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाण्याविना होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली. दादर परिसरात तर अनेकांनी इको-फ्रेंडली रंगांनी होळी खेळत पाण्याचा अपव्यय टाळला.
होळीच्या सणादिवशी आज ओळखीचे चेहरे रंगांमुळे अनोळखी झाले होते. तसेच अनेक चौका-चौकात होळीवर आधारित जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गाण्यांवर लोक नाचत होते. शहरात प्रत्येक सोसायटीत गल्लीबोळात होळीच्या सणाचा मोठा उत्साह होता. यावेळी तरुण-तरुणींनी सुट्टीचा आनंद घेत एकमेकांवर रंग उधळत होळी साजरी केली.