महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील बीडीडी चाळीत पब्जी गेमचे होळीनिमित्त होणार दहन - GAME

मुंबईतील बीडीडी चाळीतील तरुणांनी यावेळी पब्जी गेमचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला आहे. होळीच्या निमित्ताने याचे दहन करण्यात येणार आहे.

बीडीडी चाळीत पब्जी गेमचे होळीनिमित्त दहन

By

Published : Mar 20, 2019, 12:33 PM IST

मुंबई - होळीत वाईट प्रवृत्ती, सवयी यांचे दहन करण्यात येते, अशी परंपरा आहे. तरुणाईचे व्यसन बनलेली पब्जी गेमची वाईट सवय सुटावी, यासाठी मुंबईतील बीडीडी चाळीतील तरुणांनी यावेळी पब्जी गेमचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला आहे. होळीच्या निमित्ताने याचे दहन करण्यात येणार आहे.

बीडीडी चाळीतील तरुण माहिती देताना

वाईट प्रथा, वाईट रुढी यांचे अग्नीत दहन करून चांगल्याची निर्मिती व्हावी, अशी प्रार्थना होळीच्या दिवशी केली जाते. तोच उद्देश समोर ठेवून यंदा 'आपला विघ्नहर्ता' मंडळातर्फे ५२ फुटांच्या पब्जीच्या प्रतिमेचे दहन आज करण्यात येणार आहे. गेल्या ८ वर्षांपासून मंडळ सामाजिक विषयांना हात घालून होळी साजरी करत आहे. वाईट प्रथा, विचार असतील ते समाजातून नष्ट व्हावेत म्हणून मंडळाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. यंदा पब्जी गेमच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे अनेक तरुणांचे बळी जाण्याच्या घटना देशभरात घडत आहेत.

पब्जी खेळण्यासाठी मोबाईल न मिळाल्याने कुर्ल्यातील तरुणाची आत्महत्या, मध्यप्रदेश मधील तरुणाने पाण्याच्या जागी ऍसिड पिण्याची घटना असेल अशा विविध घटनांची माहितीही या पुतळ्यासोबत लावण्यात आली आहे. सरकारने या जीवघेण्या गेमवर बंदी आणली पाहिजे अशी मागणी देखील तरुणांनी केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details