महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेअर बाजार कोसळला; बीएसईमध्ये 1200 तर एनएसईमध्ये 300 अंकांची घसरण - शेअर बाजार

शेअर बाजारात आज कमालीची घसरण पाहायला मिळाली. आतापर्यंत सेन्सेक्स 1355 अंकांनी घसरून 48,714.04 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 330 अंकांची घसरणीसह 14,540 अंकांवर पोहोचला. आज सकाळी बाजार 400 अंकांच्या तोट्याने उघडला आणि तेव्हापासून सतत घसरण कायम आहे.

शेअर बाजाराची घसरण
शेअर बाजाराची घसरण

By

Published : Apr 5, 2021, 2:41 PM IST

मुंबई - शेअर बाजारात आज कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या घसरणीनंतरही सेन्सेक्स आणि निफ्टीतील पडझड सुरूच आहे. आतापर्यंत सेन्सेक्स 1355 अंकांनी घसरून 48,714.04 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 330 अंकांची घसरणीसह 14,540 अंकांवर पोहोचला. आज सकाळी बाजार 400 अंकांच्या तोट्याने उघडला आणि तेव्हापासून सतत घसरण कायम आहे. तथापि, जागतिक बाजारपेठेत कल सकारात्मक होता.

हेही वाचा -कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबई विमानतळावर भरावा लागणार १ हजार रुपये दंड

बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 434 अंकांनी किंवा 0.87 टक्क्यांनी घसरून 49,594.93 अंकांवर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टी 109.35 अंक किंवा 0.74 टक्क्यांच्या तोट्यासह 14,758 अंकांवर व्यापार करीत होता. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचा तीन टक्क्यांनी सर्वाधिक तोटा झाला. बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सही तोट्यात होते. दुसरीकडे इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स नफ्यात होते. मागील व्यापार सत्रात गुरुवारी सेन्सेक्स 50029 अंकांवर बंद झाला. गुरुवारी 520.68 अंकांनी किंवा 1.05 टक्क्यांनी वधारला. निफ्टी 176.55 अंक किंवा 1.2 टक्के वाढीसह 14867.35 अंकांवर होता. शुक्रवारी, गुड फ्रायडेमुळे बाजार बंद असल्याने सर्व प्रकारचे व्यवसाय बंद होते

ABOUT THE AUTHOR

...view details