मुंबई- फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मणविरोधी पोस्ट तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबाबत अश्लील फोटो शेअर केल्याने मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील एका होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉक्टराला फेसबुकवर हिंदूविरोधी पोस्ट करणे महागात; झाली तुरुंगाची वारी
फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मणविरोधी पोस्ट तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याबाबत अश्लील फोटो शेअर केल्याने मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील एका होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर विक्रोळी पार्क साईट पोलिसानी धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी भादंवि कलम 295 (अ) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. निषाद हे आपला दवाखाना बंद करून फरार झाले होते. ते आज जामिनसाठी विक्रोळी न्यायालयात आले असताना, पोलिसानी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना न्यायालायीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या 2 वर्षांपासून डॉ. सुनील कुमार निषाद हे हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट फेसबुकवर शेअर करत होते. महत्वाचे म्हणजे 6 महिन्यांपूर्वी तिवारी यांनी डॉ. निषाद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.