महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : घाटकोपरमध्ये आठवडाभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सरासरी 13.7 टक्क्यांची वाढ

मुंबई महापालिकेकडून कोरोनाबाबत वॉर्डनिहाय रुग्णांची आकडेवारी दिली जायची. ही आकडेवारी देणे पालिकेने बंद केले आहे. आता पालिकेने विभागनिहाय रुग्णांची टक्केवारी जाहीर केली आहे. 16 ते 22 मे दरम्यान आठवडाभरात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सरासरी 6.61 टक्के इतकी वाढ झाल्याचे पालिकेने म्हटले आहे.

घाटकोपरमध्ये आठवडाभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सरासरी 13.7 टक्क्यांची वाढ
घाटकोपरमध्ये आठवडाभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सरासरी 13.7 टक्क्यांची वाढ

By

Published : May 25, 2020, 10:43 AM IST

मुंबई - राज्यात मुंबई कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनली आहे. मुंबईत कोरोनाचे 30 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या आठवडाभरात पालिकेच्या एनटीपी नॉर्थ, पी साऊथ, एसआर साऊथ, आर सेंट्रल आणि एफ साऊथ या 8 विभागात कोरोना रुग्णांची सरासरी टक्केवारी वाढली आहे. घाटकोपरच्या एन विभागात रुग्णवाढीची सरासरी टक्केवारी सर्वाधिक असून ती 13.7 टक्के असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

मुंबई महापालिकेकडून कोरोनाबाबत वॉर्डनिहाय रुग्णांची आकडेवारी दिली जायची. ही आकडेवारी देणे पालिकेने बंद केले आहे. आता पालिकेने विभागनिहाय रुग्णांची टक्केवारी जाहीर केली आहे. 16 ते 22 मे दरम्यान आठवडाभरात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सरासरी 6.61 टक्के इतकी वाढ झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. यात घाटकोपर एन विभाग 13.7 टक्के, मुलुंड टी विभाग तसेच मालाड पी नॉर्थ या विभागात प्रत्येकी 11.9 टक्के, गोरेगाव पी साऊथ विभागात 10.9 टक्के, भांडुप एस विभागात 10 टक्के, कांदिवली आर साऊथ विभागात 9.4 टक्के, बोरीवली आर सेंट्रल विभागात 8.9 टक्के, परेल, शिवडी, लालबागच्या एफ साऊथ विभागात 8.2 टक्के इतकी सरासरी वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या 24 विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत किती वाढ झाली त्यासाठी सरासरी दरावर लक्ष ठेवले आहे. यामुळे ज्या विभागात रुग्णांच्या संख्येत सरासरी वाढ दिसून येईल त्या विभागात अधिक लक्ष दिले जात आहे. पालिकेने सरासरी 8 टक्केपेक्षा जास्त आणि त्यापेक्षा कमी असे आपले 24 विभाग विभागले आहेत. त्यात रुग्णांच्या संख्येत सरासरी 8 टक्क्यांहून अधिक वाढ असलेले 8 विभाग असून इतर विभागात 8 टक्क्यांहून कमी वाढ असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

विभागनिहाय सरासरी टक्केवारी -

आर नॉर्थ - 6.5
सी - 7.4
बी - 6.3
आर सेंट्रल - 8.9
टी - 11.9
आर साऊथ - 9.4
एच वेस्ट - 7.5
पी साऊथ - 10.9
ए - 5
पी नॉर्थ - 11.9
एस - 10
डी - 4.6
एम वेस्ट - 6.3
एन - 13.7
एफ साऊथ - 8.2
एम ईस्ट - 6.1
के ईस्ट - 7.8
जी साऊथ - 3.4
के वेस्ट - 5.5
एच ईस्ट - 7.4
एल - 7.4
एफ नॉर्थ - 4.6
ई - 4.2
जी नॉर्थ - 5.1

ABOUT THE AUTHOR

...view details