मुंबई - लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या परीक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची परीक्षा लवकरच... दोन दिवसात ठरणार वेळापत्रक
उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. बैठकीचा अहवाल बुधवारी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील दोन दिवसांत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील सीईटीसह परीक्षांचे वेळा पत्रक जाहीर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
higher-and-technical-education-department-exams-soon
हेही वाचा-मुंबईतील नेपियन सी रोड परिसरातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग
उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. बैठकीचा अहवाल बुधवारी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील दोन दिवसांत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील सीईटीसह परीक्षांचे वेळा पत्रक जाहीर करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.