मुंबई- कोहिनूरमिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यानंतर राज ठाकरे आज ईडी कार्यालयात 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवन, दादर, माहिम भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज ठाकरे ईडी चौकशी प्रकरण : शिवसेना भवन परिसरात मोठा बंदोबस्त - शिवसेना भवन
थोड्याच वेळात राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी बसेसवरही जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
मोठा पोलीस बंदोबस्त
थोड्याच वेळात राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी बसेसवरही जाळ्या लावण्यात आल्या आहेत.