मुंबई :कुवेतच्या राजघराण्याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील इमारतीची जागा रिकामी करण्यास उच्च न्यायालयाने नकार (Kuwait PM son from selling property in Mumbai) दिला. राजघराणे आणि तेथे राहणाऱ्या तीन व्यावसायिकांमधील भाडेकरार बनावट अथवा खोटे होता, असे प्रथमदर्शनी म्हणता येणार नाही असे निरीक्षण न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांनी आदेशात नोंदवले (High Court rejects plea ex Kuwait PM son) आहे.
बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने कब्जा :कुवेतच्या राजघराण्याची दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हवर येथे 'अल-सबाह कोर्ट' इमारतीतील तळ मजला, पाचवा आणि सहावा मजला मालकीचा आहे. त्यातील एक सदनिका 7 हजार चौरस फूटाचा आहे. त्या इमारतीत संजय पुनमिया, अमिश शेख आणि महेश सोनी हे तीन व्यावसाय़िक भाडेकरारावर असून त्यांनी इमारतीतील जागेवर बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप आहे. 2014 साली तिघांविरुद्ध शेख फदियाह साद अल-अब्दुल्ला यांनी खटला दाखल केला आहे. फदियाह या कुवेतचे दिवंगत पंतप्रधान शेख साद अल-अब्दुल्ला अल-सालेम अल-सबाह यांच्या कन्या आहेत. तिघाही व्यावसायिकांनी इमारतीत अतिक्रमण केले असून 'अल-सबाह कोर्ट' इमारतील सदनिका ताबडतोब रिकामी करण्याची मागणी त्यातून करण्यात आली होती.