मुंबई Kirit Somayya:किरीट सोमैया यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात बदनामी केल्याबाबत शंभर कोटी रुपयांची मानहानी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात 25 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. यावर न्यायाधीश मोडक यांनी विरोधीपक्ष नेते आंबदास दानवे औरंगाबादला राहतात. त्यामुळं तुम्ही मानहानीची याचिका तिकडं दाखल करायला हवी होती. ही याचिका मुंबईत कशी दाखल केली, असा सवाल मोडक यांनी विचारला. तसंच त्याबाबत किरीट सोमैया यांना या याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. या याचिकेवर परत चार आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
शंभर कोटींचा मानहानीचा दावा :किरीट सोमैया यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की "एका वृत्तवाहिनीवर सार्वजनिक रित्या सोमैया यांचे व्हिडिओ प्रसारित झाले होते. त्यामुळं सोमैयांची बदनामी झालीय. त्यामुळं आम्ही शंभर कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलाय. "तसंच अंबादास दानवे यांनी देखील प्रसारित व्हिडिओबाबत एका चॅनलवर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यानी केलेलं विधान किरीट सोमैया यांची बदनामी करणारं होतं. असा दावा सोमैया यांच्या वकिलानं न्यायालयात केलाय.
Kirit Somayya : किरीट सोमैयांच्या वकिलांची न्यायालयात उडाली भंबेरी, याचिकेत सुधारणा करण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
Kirit Somayya : भाजपा नेते किरीट सोमैया यांची बदनामी केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायलायत आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयानं किरीट सोमैयांच्या वकिलांना अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरात राहतात, तुम्ही तिकडं याचिका का दाखल केली नाही, असा सवाल केला.
Published : Oct 25, 2023, 7:37 PM IST
व्हिडिओ प्रसिद्ध करणं चूक :"व्हिडिओमध्ये सर्व आक्षेपार्ह मजकूर होता. व्हिडिओची खात्री न करता व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. संबंधित माध्यमाच्या संपादकाला याची कल्पना असूनही त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करणं चूक होतं, असं सोमैया यांचे वकील आदित्य भट यांनी न्यायालयाला सांगितलं.
किरीट सोमैयांविरोधात कट: "किरीट सोमैया यांनी अनेक घोटाळे बाहेर आणले आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात कट रचण्यात आल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार आंबदास दानवे यांचे वाकिल खांडेपारकर म्हणाले की, जेव्ह कोणताही याचिका दाखल होते, त्याचे नियम असतात. आमचे पक्षकार छत्रपती संभाजीनगरला राहतात. सोमैयांनी संभाजीनगरच्या न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती. मात्र, त्यांनी मानहानीची याचिका मुंबईत दाखल केलीय. त्यावर न्यायालयानं किरीट सोमैया यांच्या वकिलांना मानहानीचा दावा मुंबईत कसा दाखल केला, अशी विचारणा केली. तुम्ही दावा संभाजीनगरला दाखल करायला हवा होता. त्यावर किरीट सोमैया यांच्या वकिलांनी याचिकेत सुधारणा करण्याची न्यायालयाने अनुमती द्यावी, अशी विनंती केली. न्यायालयानं किरीट सोमैया यांना याचिकेत सुधारणा करण्याची अनुमती देत पुढील सुनावणी 4 आठवड्यानी निश्चित केली आहे. आंबदास दानवे यांच्या वातीनं रुपेश गीते, दर्शन साहुजी यांनी देखील बाजू मांडली.
हेही वाचा -
- Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- kirit somaiya viral video : राज्यात किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओनंतर संतापाची लाट; पहा व्हिडिओ
- Thackeray Group Protest: किरीट सोमैयांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक; सोमैयांच्या प्रतिमेला 'जोडेमारो आंदोलन'