महाराष्ट्र

maharashtra

मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

By

Published : Aug 11, 2020, 8:13 PM IST

येत्या 24 ते 48 तासांत मुंबईसह पश्चिम किनारपट्टी, घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी दिली. पश्चिम किनारपट्टी, घाट भागात ढगांची दाटी आहे. तर मुंबईत ढगाळ वातावरण आहे, असेही होसाळीकर यांनी माहिती देताना सांगितले.

मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई :पुढील 24 ते 48 तासात मुंबईसह पश्चिम किनारपट्टी, घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी दिली. पश्चिम किनारपट्टी, घाट भागात ढगांची दाटी आहे. तर मुंबईत ढगाळ वातावरण आहे, असेही होसाळीकर यांनी माहिती देताना सांगितले.

बंगालचा उपसागर आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा 13 ऑगस्टच्या आसपास बनेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान गुजरात, पूर्व राजस्थान, उत्तर कोकण, गोवा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील हवामानाचा अंदाज :

११-१२ ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

१३-१५ ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

इशारा :

११ ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर, मध्य महाराष्ट्राच्या धाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

१२ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

१३ ऑगस्ट : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

१४-१५ ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

गेल्या 24 तासातील आज सकाळी नोंदवलेले तापमान आणि पर्जन्यमान :

मुंबई शहर : तापमान 30 अंश से. (कमाल), 26.5 (किमान) मुंबई उपनगर : तापमान 31. 0 अंश से. (कमाल), 26.0 (किमान) पाऊस मुंबई शहर : 7.8 मिमीपाऊस मुंबई उपनगर : 4.5 मिमी1 जून पासून झालेला पाऊस : 2458 मिमी( मुंबई)हवेतील आर्द्रता : 92 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details