महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र अन मराठवाड्यात पावसाची शक्यता - पाऊस बातमी

मुंबईत शुक्रवारी (दि. 5 जून) विश्रांत्री घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली व भिंवडीतही मुसळधार पाऊस झाला असून सखल भागात पाणी साचले आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jun 6, 2020, 9:26 AM IST

Updated : Jun 6, 2020, 10:05 AM IST

मुंबई - शुक्रवारी (दि. 5 जून) विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच दमदार हजेरी लावली आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली होती. सकाळी साडे नऊच्या दरम्यान काही ठिकणी पाऊस थांबला आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानी वर्तवली जात आहे.

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली होती आणि अधूनमधून कडक ऊन देखील पडत होते. यामुळे पुन्हा थोडा उकाडा जाणवण्यास सुरूवात झाली होती. मात्र, आज पुन्हा सकाळी मुंबईतील दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, किंग्ज सर्कल, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, पवई, भांडुप या परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. किंग्ज सर्कल, मालाड या भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. आता काही ठिकणी पावसाने विश्रांती घेतली असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस सूरु आहे.

हेही वाचा -'हा तर राज्यपालांच्या आडून सरकारची कोंडी करण्याचा भाजपचा डाव'

Last Updated : Jun 6, 2020, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details