मुंबई- मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने मुंबईमध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला पावसाने झोडपले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत २४९.७ मिमीची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईची तुंबई झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.
सोमवारी गणपती आगमनासह मुसळधार पावसाने पुन्हा श्री गणेशा केला. मुंबईत सोमवारी दिवसभरात १३१.४ मिमी पाऊस पडला. तर मंगळवारी ११८.३ मिमी पाऊस पडला. मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कुलाबा येथे १२२, तर सांताक्रूझ येथे ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे माटुंगा, किंग सर्कल, दादर, हिंदमाता, सायन, प्रतीक्षा नगर, दादर, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, गोरेगाव, कांदिवली, घाटकोपर आदी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली.
गरज असेल तरच घराबाहेर पडा