महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईची झाली 'तुंबई'; पावसाचा जोर ओसरला - dadar

यावर्षी उशिराने शुक्रवारी (२८ जून) सुरू झालेला हा पाऊस सलग चौथ्या दिवशीही सुरू आहे. त्यामुळे मुंबई दादर, सायन, माटूंगा अशा अनेक भागात रस्त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे सकाळी नागरिकांना कार्यालयात जाताना आणि बच्चे कंपनीला शाळेत जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

LIVE : मुंबईची झाली 'तुंबई'; वाहतुक खोळंबली, लोकलही धिम्यागतीने

By

Published : Jul 1, 2019, 8:12 AM IST

Updated : Jul 1, 2019, 2:54 PM IST

मुंबई - पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दादर कुर्ला आणि पश्चिम उपनगरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. सकाळी देखील पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांची आणि बच्चे कंपनीची तारांबळ उडाली आहे.

Live Updates:

  • पावसाने विश्रांती घेतली असल्याने मुंबईत दुपारच्या सत्रातील शाळा सुरळीत असल्याची शिक्षण विभागाची माहिती.
  • ज्या ठिकाणी पाऊस अधिक झाला त्या ठिकाणी काही शाळांनी सकाळी लवकर सुट्टी दिली होती.
  • सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबई केली यावेळी लोकल ट्रेन बरोबरच रस्तेही ठप्प झाल्याचे दिसून आले.
  • पूर्व द्रुतगती मार्गावरून दादर कडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.
  • किंग सर्कल येथे गुडघ्यावर पाणी भरले होते.
  • पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पाणी काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, समुद्राला भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता.
  • यामुळे पुन्हा एकदा नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रात्री पडलेल्या पावसादरम्यान विजेचा झटका लागून एकाचा मृत्यू
शिवाजी नगर, गोवंडी येथे घरात शॉक लागून मोहम्मद कय्युब अयुब काझी, (वय ३० वर्ष) असे मृतकाचे नाव आहे.

विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात
सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने थोडावेळ विश्रांती घेतली होती. मात्र, विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरील सेवा उशिराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे तर मध्य हार्बर रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

  • भक्ती पार्क परिसर तसेच पूर्वमार्गावर ट्रॅफिक जॅम. वाहनांच्या लांबच लांब रांगा
    भक्ती पार्क परिसर तसेच पूर्वमार्गावर ट्रॅफिक जॅम. वाहनांच्या लांबच लांब रांगा
    भक्ती पार्क परिसर तसेच पूर्वमार्गावर ट्रॅफिक जॅम. वाहनांच्या लांबच लांब रांगा

सायन रेल्वे स्टेशनवर साचले पाणी, वाहतूक खोळंबली

मुसळधार पावसामुळे सायन रेल्वे स्टेशनवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबली.

मुसळधार पावसाचा कोर्टातील सुनावनीला फटका

  • मालेगाव २००८ ब्लास्ट सुनावणी दरम्यान विशेष न्यायालयात फक्त न्यायाधीश आणि आरोपी क्रमांक ५ समीर कुलकर्णी उपस्थित.
  • पावसामुळे इतर आरोपी हजर राहू न शकल्याने आजची सुनावणी तहकूब.

या ठिकाणी साचले पाणी
धारावी, विद्यालंकार कॉलेज वडाळा, डॉ. आंबेडकर रोड भायखळा, दादर टिटी, हिंदू कॉलनी, सायन रावळी कॅम्प, जिटीबी नगर, महालक्ष्मी, घाटकोपर एससीएलआर पूल, चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी, तपस्या विईएस इंग्लिश कॉलेज चेंबूर, शिंदेवाडी, महात्मा फुले नगर, बांद्रा बस डेपो, खेरवाडी,

  • १२ ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना / कोणीही जखमी नाही

३० जून २०१९ सकाळी ८ ते १ जुलै रोजी सकाळी ६ पर्यंतचा पाऊस

  • शहर - ९१.२२ मिमी,
  • पूर्व उपनगर - ७८.११ मिमी
  • पश्चिम उपनगर - ५५.५९ मिमी
  • मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
  • मुंबई उपनगरात ९३ मीमी पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत ५१५ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
  • ठाण्यात आत्तापर्यंत १४८ मीमी पाऊस झाला.
  • कल्याणमध्ये १२७ मीमी पाऊस झाला.
  • भिवंडी मध्ये २१५ मीमी पाऊस झाला.
  • पनवेल - १६६ मीमी

पाणी साचले / वाहतूक वळवली

  • माटुंगा गांधी मार्केट जवळ पाणी साचल्याने भाऊ दाजी रोडवरून वाहतूक वळवली.
  • बांद्रा एसव्ही रोडवरील नॅशनल कॉलेजजवळ पाणी साचल्याने लिंक रोड वरून वाहतूक वळवली.
  • हिंदमाता येथे पाणी साचल्याने बेस्टच्या बसेस हिंदमाता पुलावरून वळवण्यात आल्या आहेत.
  • शिवडीकडे जाणारे ट्रॅफिक जीडी आंबेकर मार्गावरून वळवण्यात आले आहे.

लोकलसेवेवर पावसाचा परिणाम

  • सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम लोकल सेवेवर जाणवला आहे.
  • पश्चिम रेल्वे मार्गावर मरीनलाईन्स स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर वर बांबू पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान ठप्प झाली.
  • ऐन सकाळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे चर्चगेट ते मरीनलाईन्स स्थानकात प्रवासी गर्दी उसळली आहे.
  • पश्चिम रेल्वेने दुरुस्ती हाती घेतली असून ३० मिनिटांत वाहतूक सुरळीत होईल असा दावा केला आहे.

शुक्रवारपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या पहिल्याच पावसाने मुंबईकरांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी रस्ते पाण्याने भरले होते. तर, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्ते तुंबले, नागरिकांची उडाली तारांबळ

यावर्षी उशिराने शुक्रवारी (२८ जून) सुरू झालेला हा पाऊस सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. त्यामुळे मुंबई दादर, सायन, माटूंगा, अशा अनेक भागात रस्त्यात पाणी साचलं आहे. त्यामुळे सकाळी नागरिकांना कार्यालयात जाताना आणि बच्चेकंपनीला शाळेत जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अरबी समुद्रात हवेचा दाब वाढला आहे. त्यामुळे कोकणच्या आजूबाजूच्या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यामुळे पुढील ४ दिवस सलग मुंबईसह ठाणे इतर भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसारच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.

Last Updated : Jul 1, 2019, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details