महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवलीत कोसळधार! स्टेशन परिसर पाण्याखाली गेल्याने चाकरमानी परतले घरी - kalyan

डोंबिवली तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने फज्जा उडविला आहे. कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणच्या स्टेशन परिसरात अक्षरशः नद्या वाहू लागल्या आहेत.

डोंबिवलीत कोसळधार

By

Published : Aug 3, 2019, 9:24 AM IST

ठाणे- येथील डोंबिवली तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने फज्जा उडविला आहे. कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणच्या स्टेशन परिसरात अक्षरशः नद्या वाहू लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या डोंबिवलीकरांना पुढील प्रवास करणे शक्य नसल्याने घरी परतावे लागत आहे.

स्टेशन परिसरातील अनेक इमारतीत तसेच घरांमध्ये पाणी घुसले आहे. डोंबिवलीतील फडके रोड, बाजीप्रभू चौक, पी अ‌ॅण्ड टी कॉलनी त्याचबरोबर पश्चिमेकडील गुप्ते रोड, जुनी डोंबिवली, रेल्वे स्टेशन परिसर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. डोंबिवलीचा स्टेशन परिसर, मानपाडा रोड, कल्याण-शिळ मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शहरात सकाळपासून पावसाने उग्र रूप धारण केल्याने अनेक रस्ते, चौक पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details