मुंबई - पुढील 24 तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल. 7 ते 9 जुलै दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
पुढील 24 तासांत गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असे स्काय मेट या हवामान विषयक खासगी संस्थेने सांगितले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ-दक्षिण गुजरातच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. कोकण गोवा, कर्नाटकचा किनारी प्रदेश, केरळचा काही भाग, आंध्र प्रदेश, तेलंगाणा उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्य भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांत मान्सून सक्रिय राहील. यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकातील अंतर्गत भागात मान्सून सामान्य असेल. तामिळनाडू, रायल सीमा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मान्सूनचा प्रभाव कमी असेल. त्यामुळे एक-दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटलं आहे.
मान्सूनची अक्षांष रेषा अनुपगड, सीकर, ग्वाल्हेर, सिधी, रांची, जमशेदपूर आणि हल्दिया मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत बनली आहे. गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही स्थिती येत्या काही तासात बदलून कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अधिक वाढेल. पूर्व उत्तर प्रदेशात चक्रीय वार्यांचे क्षेत्र आधीपासूनच सक्रिय आहे. राजस्थानच्या ईशान्य भागावरदेखील चक्रीय वार्यांची स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती स्कायमेटने दिली.
दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
मागील २४ तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) -
कोकण आणि गोवा - ठाणे 38, मंडणगड 25, श्रीवर्धन 23, माथेरान, म्हसळा, पनवेल, उरण 29 प्रत्येकी, मुंबई (सांताक्रूझ) 20, दापोली, कल्याण 19 प्रत्येकी, भिरा, चिपळूण, पोलादपूर, सांगे, उल्हासनगर 17 प्रत्येकी, दोडा मार्ग 16, बेलापूर (ठाणे), पेण 15 प्रत्येकी, अंबरनाथ, भिवंडी, खेड, पालघर, वसई 14 प्रत्येकी, कणकवली, राजापूर, सुधागड पाली 13 प्रत्येकी, मुरुड, पेडणे, रोहा, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी 12 प्रत्येकी, अलिबाग, देवगड, कर्जत, खालापूर, लांजा, मालवण, केपे 11 प्रत्येकी, गुहागर, हणे, विक्रमगड 10 प्रत्येकी, माणगाव, तलासरी 9 प्रत्येकी, कुडाळ, वैभववाडी 8 प्रत्येकी, कानकोन, जव्हार, महाड, वाला 16 प्रत्येकी, उहाणू, रामेश्वरी, रत्नागिरी, शहापूर, वेंगुर्ला 6 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), मुरबाउ 5 प्रत्येकी.
मध्य महाराष्ट्र - महाबळेश्वर 14, लोणावळा (कृषी) 19, गगनबावडा 10, गिरना (धरण) 8, आजरा 5, जावळी मेधा, कोपरगाव, वेल्हे 4 प्रत्येकी, अमळनेर, चंदगड, इगतपुरी, पाटण, राधानगरी, सदना, बागलाण 3 प्रत्येकी, धारणगाव, पन्हाळा, पौड़ मुळशी, शाहुवाडी, वडगाव मावळ 2 प्रत्येकी, भोर, चाळीसगाव, गडहिंग्लज, कर्जत, कोरेगाव, मुळदे, नांदगाव, नवापूर, पेठ, सातारा, सिन्जर 1 प्रत्येकी.
मराठवाडा- सिल्लोड 3, अहमदपूर, अंबड, जाफराबाद 2 प्रत्येकी, आष्टी, भोकरदन, देग्लूर, जळकोट, माहूर, फुलंब्री, उमरगा 1 प्रत्येकी.
विदर्भ- मुल चेरा 11, भामरागड 7, वर्धा 6, चंद्रपूर 5, बुलढाणा, सिरोंचा 4 प्रत्येकी, भिवापूर, कारंजा लाड, कुरखेडा, मालेगाव, मोर्शी, नेर, सेल्लू 3 प्रत्येकी, अहिरी, चिखली, देऊळगाव राजा, कलमेश्वर, मंगलूर, पातूर, सिंधखेड राजा 2 प्रत्येकी, अंजनगाव, बाभुळगाव, बाळापूर, भद्रावती, चामोर्शी, चिमूर, देवळी, एटापल्ली, हिंगणघाट, हिंगणा, कळंब, काटोल, खामगाव, खरंगा, महागाव, मानोरा, मेहकर, नागभीड, नांदगाव काजी, नरखेडा, रिसोड, उमरेड, वरोरा, वरुड, वाशिम, यवतमाळ 1 प्रत्येकी.
घाटमाथा- डुंगरवाडी 20, दावडी, शिरगाव 17 प्रत्येकी, ताम्हिणी 16, अम्बोणे 13, लोणावळा (टाटा), कोयना (पोफळी) 11 प्रत्येकी, खोपोली 10, लोणावळा (ऑफिस) 9, कोयना (नवजा) 8, वळवण 7, खंद 7.
हवामान अंदाज -
6 जुलै - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
7 ते 9 जुलै - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता