महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात उष्णतेची लाट, बहुतांश जिल्ह्यात पारा ४० अशांच्या पुढे - wave

विदर्भ व मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, परभणी मध्ये तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढे गेला होता.

राज्यात उष्णतेची लाट

By

Published : Apr 27, 2019, 2:07 PM IST

मुंबई - राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आली आली आहे. कोकण व काही भाग वगळता सर्व जिल्ह्यामधील तापमानचा पारा ४० अशांच्यावर पुढे गेला आहे. राज्यात पुन्हा शनिवारपासून २९ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे

विदर्भ व मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, परभणी मध्ये तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढे गेला होता. तर सोलापूर, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले होते.

राज्यात दहा दिवसांपूर्वी कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यातील नागरिकांना आणखी काही दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. २९ एप्रिलनंतर उन्हाचा कडाका काही प्रमाणात कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आज सर्वात जास्त कमाल तापमान ४६.३ अंश अकोला जिल्ह्यात नोंदवले गेले. तसेच अमरावती ४५, वर्धा ४५.५, चंद्रपूर ४५.४, नागपूर ४४.३, परभणी ४५, औरंगाबाद ४२.५, उस्मानाबाद ४२.१, मालेगाव ४२.६, सोलापूर ४२.८, नाशिक ४०.५, अहमदनगर ४३.४, जळगाव ४३, महाबळेश्वर ३३.४, यवतमाळ ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details