मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)कडून अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती या दोघांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात केलेल्या 2 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई दाव्याचीही आज सुनावणी होणार आहे. या दोन्ही याचिकांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे.
रिया चक्रवर्ती व कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी
रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती या दोघांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात केलेल्या 2 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई दाव्याचीही आज सुनावणी होणार आहे. या दोन्ही प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
रिया व कंगना
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांना अटक केलेले आहे. या प्रकरणी काही वक्तव्ये करून अभिनेत्री कंगना रणौत ही चर्चेत आली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तिचे कार्यालय अनधिकृत बांधकामात येत असल्याचे ठरवून त्यावर तोडक कारवाई केली होती. कंगनाने याबाबत पालिकेविरोधात दावा ठोकला आहे.