मुंबई- महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२(२)(व) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर रावेर-यावलचे आमदार हरीभाऊ माधव जावळे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.
हरीभाऊ जावळेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा; महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
हरीभाऊ माधव जावळे
या संदर्भात आज महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावरील ही नियुक्ती सदर नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षासाठी किंवा राज्य सरकारची मर्जी असेल तोपर्यत असेल. या आदेशाची प्रत उपसचिव महाराष्ट्र शासन सु. सं.धपाटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेली आहे.