मुंबई- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सुप्रसिद्ध संगितकार भुपेन हजारीका आणि लोकनेते नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
विधानसभा
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हा अभिनंदन प्रस्ताव वाचून दाखवला. लोकनेते नानाजी देशमुख, सुप्रसिद्ध सगीत दिग्दर्शक भुपेन हजारीका यांना भारत रत्न दिल्याबद्दल बागडे यांनी सभागृहाचे आभार मानले.
भूपेन हजारिका आसाममधील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक होते. याशिवाय ते कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृतीचे अभ्यासक होते. बालपणापासूनच संगीताची साधना सुरू करणाऱ्या भूपेन हजारिका यांनी वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं होतं. भूपेन हजारिका यांना 1975 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने तर 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष बागडे यांनी दिली आणि हा अभिनंदन प्रस्ताव संमत करण्याची विनंती करत प्रस्ताव संमत झाल्याचे सांगितले.