महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रमजान ईद - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

mumbai
मुंबई

By

Published : May 13, 2021, 9:57 PM IST

मुंबई - पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता अर्थात ईद-उल-फित्रच्या (रमजान ईद) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

'रमजान हा नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा असा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांना आरोग्य मिळेल अशी काळजी घेऊया. ईदचा उत्साह- उत्सव सुख-समृद्धी आणि आरोग्यदायी संपन्नता घेऊन यावा ही प्रार्थना', असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देताना म्हटले.

दरम्यान, गुरुवारी किंवा शुक्रवारी (चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी) सर्वत्र मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.

हेही वाचा -'नदीत मृतदेह टाकणे हा क्लेशदायक प्रकार'

ABOUT THE AUTHOR

...view details