मुंबई- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर गेल्या ५० वर्षांहून अधिक वर्ष काम करणाऱ्या स्थानिक हमालांकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षीसुद्धा हमालांकडून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे, या वर्षी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे ज्यांचे नुसकान झाले, त्यांना बळ मिळून उभारी मिळावी यासाठी हमालांनी गणपतीला साकडे घातले आहे.
पूरग्रस्तांसाठी रेल्वे हमालांनी केला गणपतीला नवस - Sangli flood
सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ज्या लोकांची संसार उद्ध्वस्त झालीत. ज्यांच्या घरांची पडझड झाली. अशा पीडितांसाठी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर काम करणाऱ्या हमालांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे. पूरग्रस्त लोकांचा संसार चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा उभा राहावा म्हणून त्यांनी गणपती बाप्पाकडे नवस केला आहे.
पूरग्रस्तांसाठी रेल्वे हमालांनी केला गणपतीला नवस
सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरामुळे ज्या लोकांची संसार उद्ध्वस्त झालीत. ज्यांच्या घरांची पडझड झाली. अशा पीडितांसाठी यावर्षी त्यांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे. पूरग्रस्त लोकांचा संसार चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा उभा राहावा म्हणून त्यांनी गणपती बाप्पाकडे नवस केला आहे. याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी महेश बागल यांनी.