महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : आकडे बोलतात; मुंबईतील एकूण मृत्यूपैकी निम्मे मृत्यू 'या' सात विभागात - corona new cases today in mumbai news

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 1 हजार 711 वर पोहोचला होता. त्यापैकी 74 हजार 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 5 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, पालिकेच्या 24 विभागांपैकी सात विभागात 2 हजार 599 मृत्यू झाले आहेत.

मुंबईतील कोरोनामुळे झालेल्या 5681 पैकी 2599 मृत्यू "या" सात विभागात
मुंबईतील कोरोनामुळे झालेल्या 5681 पैकी 2599 मृत्यू "या" सात विभागात

By

Published : Jul 24, 2020, 4:39 PM IST

Updated : Jul 24, 2020, 5:18 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून 22 जुलैपर्यंत 5 हजार 681 मृत्यू झाले आहेत. यामध्ये, पालिकेच्या 24 विभागांपैकी सात विभागात 2 हजार 599 मृत्यू झाले आहेत. मृत्यूंची ही आकडेवारी पाहिल्यास सुमारे 40 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे या सात विभागातील असल्याचे स्पष्ट होते.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईत पहिला रुग्ण 11 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर, चारच महिन्यात मुंबईत कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 22 जुलैला मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 1 हजार 711 वर पोहोचला होता. त्यापैकी 74 हजार 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 5 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 21 हजार 820 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण होते. 22 जुलैपर्यंत मुंबई महापालिकेच्या 24 विभागात एकूण 5 हजार 681 मृत्यूंची नोंद झाली आहे.

'या' सात विभागात सर्वाधिक मृत्यू
मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण मृत्यूपैकी निम्म्यापेक्षा जास्त मृत्यूचा आकडा हा पुढील सात विभागांचा मिळून आहे. अंधेरी पूर्व येथील 'के ईस्ट' विभागात 433, धारावी दादर माहीम येथील 'जी नॉर्थ' विभागात 421, कुर्ला येथील 'एल' विभागात 391, भांडूप विक्रोळी येथील 'एस' विभागात 374, वरळी डिलाईल रोड येथील 'जी साऊथ' विभागात 331, वांद्रे खार पूर्व येथील 'एच ईस्ट' विभागात 328 तर घाटकोपर येथील 'एन' विभागात 321, अशा सात विभागात एकूण 2 हजार 599 मृत्यूंची नोंद झाली आहे. हा आकडा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे.

मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न -

पालिकेच्या रुग्णालयात रात्री 1 ते पहाटे 5 या दरम्यान ऑक्सिजन काढून रुग्ण शौचालयात जात होते. त्यावेळी ऑक्सिजन काढल्याने ते पडून त्यांचा मृत्यू होत होता. आता रुग्णांच्या खाटांजवळच शौचालयाचे भांडे देण्यास सांगितले आहे. रुग्णांच्या मृत्यूचे व्हिडिओ ऑडिट करण्यासही सांगण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स, इतर कामगारांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सर्वांना टीम म्हणून काम करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत नक्की घट होईल. रुग्णांचे निदान लवकर व्हावे म्हणून पालिका अँटीजेन टेस्ट, डॉक्टर आपल्या दारी, आदी विविध उपाययोजना करत आहे. यामुळे वेळीच उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढेल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले आहे.


विभाग आणि मृत्यू

  • अंधेरी पूर्व - के ईस्ट 433
  • धारावी दादर - जी नॉर्थ 421
  • कुर्ला - एल 391
  • भांडूप - एस 374
  • वरळी - जी साऊथ 331
  • वांद्रे खार पूर्व - एच ईस्ट 328
  • घाटकोपर - एन 321
  • एकूण - 2599
Last Updated : Jul 24, 2020, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details