मुंबई - पायल तडवी आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. पायल तडवीने गेल्या २२ मे'ला ३ वरिष्ठ डॉक्टरकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख निलंबित - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. पायल तडवी नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. गेल्या २२ तारखेला रुग्णालयाच्या परिसरातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णालयातील ३ वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तीनही महिला डॉक्टर फरार असून पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी करून आरोपीला अटक करण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटना करीत आहेत.