मुंबई- आज सकाळपासूनच शहरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे उपनगरांमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जोरदार पावसामुळे विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला आहे. या नाल्याचे पाणी आता परिसरातील घरांमध्ये शिरत आहे.
विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला; पाणी लोकांच्या घरात शिरले
आज सकाळपासूनच शहरात पावसाने जोर धरला आहे. या जोरदार पावसामुळे विद्याविहार पूर्वेचा नाला तुडुंब भरला आहे. या नाल्याचे पाणी आता परिसरातील घरांमध्ये शिरत आहे.
पावसाच्या पाण्याने नाला तुडुंब भरल्याचे चित्र
विद्याविहार पूर्वेचा नाला ओएनजीसी कॉलनीतून जातो. हा नाला पुढे एका मोठ्या नाल्यास जोडला गेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने हा नाला पूर्णत: भरलेला आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी येथील झोपडपट्टीत शिरत आहे. यामुळे विद्याविहार पूर्वेच्या ओएनजीसी कॉलनीच्या नागरिकांचे हाल होत आहेत.