महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Guidelines For Schools : मुंबईतील शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने (Corona spread is decreasing) सरकारने सोमवार २४ जानेवारीपासून पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने मुंबईतील शाळा २७ जानेवारीपासून सुरू होतील असे सांगितले होते. मात्र आता या शाळा २४ जानेवारीपासून सुरू (School will start from January 24) होणार असून त्यासाठी मार्गदर्शक सुचना (Guidelines issued for starting schools) जारी करण्यात आल्या आहेत.

Guidelines For Schools
शाळांसाठी मार्गदर्शक सूचना

By

Published : Jan 21, 2022, 1:22 PM IST

मुंबई:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार कमी (Corona spread is decreasing) झाल्याने राज्य सरकारने येत्या सोमवार २४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला आहे. यानुसार शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन यासाठी वेळ लागणार असल्याने शाळा २४ पासून सुरू करता येणार नाही असे पालिकेचे म्हणणे होते. मात्र रात्री उशिरा पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी एक परिपत्रक काढत शाळा २४ जानेवारीपासून (School will start from January 24) सूरु करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना (Guidelines issued for starting schools) जारी केल्या आहेत.

या आहेत मार्गदर्शक सूचना -
पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे वर्ग २४ जानेवारीपासून सुरू करण्यात यावेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून संमती पत्र घ्यावे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती पत्र देणार नाहीत त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे. सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे. शाळा सुरू करणे व कोविड नियमाच्या पालनाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल. पालिका शाळांचे सहाय्यक आयुक्तांच्या मदतीने सॅनिटायझेशन करावे. शाळेतील कोव्हिडं सेंटर, विलगिकरण केंद्र, लसीकरण केंद्र इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. इतर शाळांनी स्वतःचे सॅनिटायझेशन करून घ्यावे. कोव्हिड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र तपासणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा शाळेच्या कामासाठी परत बोलवावे. सर्व शाळा पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे.

अशी असेल व्यवस्था
- एका बाकावर एक विद्यार्थी
- इंग्रजी झीग झ्याग पद्धतीने बसण्याची व्यवस्था
- संमती दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण
- संमती न दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण
- मास्क घालून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार
- शाळा वेळोवेळी सॅनिटायझ कराव्या लागणार
- विद्यार्थी एकत्र येऊन किंवा गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंगचे पालन होणार नाही असे कार्यक्रम करता येणार नाहीत

ABOUT THE AUTHOR

...view details