मुंबई : मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे चित्र समोर आले. यात गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांच्या मुलीच्या नेतृत्वाखालील लढलेल्या ग्रामविकास पॅनेलचा पराभव ( Bhavini Patil Gramvikas Panel Defeat ) झाला. मोहाडी गावातून लढलेल्या या निवडणूकीत दहापैकी सात जागांवर शरद पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार जिंकूण ( Mohadi Gram Panchayat Election) आले.
दहापैकी सात जागांवर पराभव :भाविनी पाटील या निवडणूक जिंकलेल्या त्यांच्या पॅनलमधील तीन उमेदवारांपैकी एक आहेl. भाविनी पाटील यांना बसलेला दुसरा धक्का म्हणजे भाविनी पॅनलचा सरपंचपदाचा उमेदवारही शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलच्या उमेदवाराकडून ( Sharad Patil panel wins ) पराभूत झाला. भाविनी या पूर्वी मोहाडी गावच्या सरपंच होत्या. यावेळी हे पद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव ( Gram Panchayat Election ) झाले.