महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Western Railway : पश्चिम रेल्वे स्थानकांवर जीपीएस डिव्हाईस इंस्टॉल काम सुरू ; प्रवाशांना मिळणार यात्री ॲप फायदा - पश्चिम रेल्वे स्थानकांवर जीपीएस डिव्हाईस

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway station) प्रवाश्यांना आता यात्री ॲप वापरणे सोपे होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे 93 स्थानकांवर जीपीएस डिव्हाईस इंस्टॉल काम सुरू केले आहे. रियल टाइम लोकेशन ट्रेनमध्ये बसल्यावर यात्री ॲपद्वारे मिळणार (GPS device installation) आहे. त्यामुळे प्रवाशांना आपण कोणत्या ठिकाणी आहोत, हे समजणे सोपे जाईल.

Western Railway
पश्चिम रेल्वे

By

Published : Dec 15, 2022, 6:46 PM IST

रेल्वे 93 स्थानकांवर जीपीएस डिव्हाईस इंस्टॉल काम

मुंबई :पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांसाठी जीपीएस डिव्हाईस इन्स्टॉल करणे सुरू केले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाश्यांना यात्री ॲप सहज वापरता येणार आहे. विशेष एसी लोकलबाबत देखील सर्व माहिती त्यात समाविष्ट (GPS device installation work started) असेल.



प्रवासी तिकीट : रेल्वेच्या लोकलचे तिकीट काढण्यासाठी प्रचंड रांगा पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकात देखील असतात. त्या ठिकाणाची गर्दी कमी करावी, म्हणून पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टीम प्रणाली वापरून अनेक प्रवासी तिकीट काढत असतात. त्याचा फायदा पश्चिम रेल्वे मार्गवरील प्रवाश्यांनी देखील घ्यावा. यादृष्टीने यात्री ॲपसाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी ही प्रणाली पश्चिम रेल्वे स्थानकांवर बसवली जात (GPS device at Western Railway) आहे.



जीपीएस डिव्हाईस : पश्चिम रेल्वे 93 रेल्वे स्थानकावर जीपीएस डिव्हाईस इन्स्टॉल केली जात (Western Railway station) आहेत. मध्य रेल्वेच्या मार्गावर ज्याप्रमाणे रियल टाइम लोकेशन ट्रेनमध्ये बसल्यावर यात्री पद्वारे मिळते. तसेच आता पश्चिम रेल्वेच्या प्रवासी जनतेसाठी ती सोय उपलब्ध होत आहे. मुंबईत काम नोकरीच्या निमित्ताने लाखो प्रवासी रोज येतात. प्रवासी ट्रेनमध्ये चढल्यावर त्यांना ट्रेन कोणत्या रेल्वे स्थानकावर आहे किंवा दोन स्टेशन दरम्यान लोकल अचानक थांबली, तर कुठल्या स्थळी ते आहेत ही माहिती देखील यामधून जनतेला समजणार (GPS device installation work started) आहे.


यात्री रेल्वे ॲप : यासंदर्भात धनलक्ष्मी गुप्ता रेल्वे प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, मध्य रेल्वेवर ही सोय होत आहे .आता पश्चिम रेल्वेवर देखील जीपीएस प्रणाली बसवली जात आहे. तिचे काम लवकर पूर्ण झाल्यावर आम्हाला देखील त्याचा उपयोग होईल. विशेषत: कोणत्या ठिकाणी आपण आहोत, याची माहिती यात्री रेल्वे ॲपवर पटकन मिळते. ती पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करताना महत्वाची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details