मुंबई - राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथ खजीना या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करू नका, अशा शब्दात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - राजगृह तोडफोड न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करू नका, अशा शब्दात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि घरांच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारच्या घटनेनंतर देशभर निषेध व्यक्त होत आहे.