मुंबई- कोरोना व्हायरसचा राज्यात विळखा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. उपाययोजना करायला थोडा उशीर झाला. मात्र, सरकारने योग्य पावले उचलली आहेत, असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
COVID19: 'सरकारने योग्य पावले उचललीत...' राज ठाकरेंकडून सरकारचे कौतुक
कोरोनाची गंभीरता लक्षात घेता लोकांनी घराबाहेर पडू नये. स्थिती फार भयानक होऊ शकते. सरकारला सहकार्य करुन लोकांनी घरात बसून सहकार्य करावे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचा विचार झाला पाहिजे. ज्या खासगी मालकांनी सध्या कामगारांना सुट्ट्या दिल्या आहेत.
राज ठाकरेंकडून सरकारचे कौतुक
कोरोनाची गंभीरता लक्षात घेता लोकांनी घराबाहेर पडू नये. स्थिती फार भयानक होऊ शकते. सरकारला सहकार्य करुन लोकांनी घरात बसून सहकार्य करावे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचा विचार झाला पाहिजे. ज्या खासगी मालकांनी सध्या कामगारांना सुट्ट्या दिल्या आहेत. त्यांनी कामगारांना पगार द्यावा. अनेक आजारी आणि वृद्ध लोक आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाईन फूडची सोय झाली पाहिजे. तसचे लोकांनी ऐकले नाही तर सरकारला कठोर पर्याय निवडावा लागेल, असेही राज ठाकरे म्हणाले.