मुंबई- महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्तांना नागरिकांना मदत करावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सांगली व कोल्हापूरला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या विभागातील लाखो नागरिकांना एनडीआरएफ, नेव्ही, कोस्ट गार्ड, सैनिकांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. या पूरग्रस्तांना आर्थिक, खाद्य पदार्थ, औषधे आदी उपयोगी पडतील, असे साहित्य देऊन मदत करता यावी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
उप विभागीय अधिकारी कार्यालय, विद्याविहार, अंधेरी बोरिवली मुलुंड येथील तहसील कार्यालयातही मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. इच्छुक मुंबईकर नागरिकांनी या कार्यालयातील मदत कक्षात आर्थिक, खाद्य पदार्थ, औषधे आदी उपयोगी पडतील अशा साहित्याची मदत करावी. अधिक माहितीसाठी 022 - 26556799, 25111126, 26231368, 28075034, 25602386 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्य सरकारचे मदतीचे आवाहन