महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'इतिहास वाचून वर्तमानातील आव्हाने स्वीकारा'

सर्वांनी इतिहास वाचून आणि त्यातून शिकून वर्तमान काळातील आव्हाने स्वीकारली पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या 69व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : Jan 18, 2020, 5:32 PM IST

Updated : Jan 18, 2020, 6:02 PM IST

मुंबई- आपला इतिहास गौरवशाली आहे. आपण त्यावेळी किती चुका केल्या होत्या, तेही आपल्याला कळेल. तर आपल्या इतिहासाची गौरवशाली पानेसुद्धा आम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आम्ही सर्वांनी इतिहास वाचून आणि त्यातून शिकून वर्तमान काळातील आव्हाने स्वीकारली पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत केले.

इतिहास वाचून वर्तमानातील आव्हाने स्वीकारा


श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 69 वा दीक्षांत सोहळा आज (दि. 18 जाने.) विद्यापीठात पार पडला. यावेळी राज्यपालांनी आपल्या‍ अभिभाषणात हे आवाहन केले. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शशीकला वंजारी, डॉ. नंदिता पाठक, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे, प्र-कुलगुरू विष्णू मगरे आदी उपस्थित हेाते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे आणि सुप्रसिध्द लेखिका आणि कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (हॉनोरीस कॉसो) पदवी प्रदान करण्यात आली.

हेही वाचा - सेंट जाॅर्ज रूग्णालय ठरले स्वच्छतेच्या बाबतीत 'अव्वल'

राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले, की आजकाल लोक इतिहास आणि भूगोल वाचतच नाहीत. लहानपणापासून मोबाईलचे व्यसन लागले लहान मुलेसुद्धा मोबाईलच्या प्रेमात पडलेले आहेत. आमच्या काळात मोबाईल नव्हता. परंतु आम्ही घरा-घरात आणि जनमानसात जाऊन फिरत होतो. संसदेमध्ये पंतप्रधान नवीन तंत्रज्ञानासाठी आग्रही आहेत सगळेजण डिजिटलचा हात धरतात. परंतु आमच्या मित्रांना विनोदाने म्हणतो, मी तर लहानपणापासूनच डिजीटल आहे. घराघरापर्यंत जातो आणि घरापर्यंत माझी नेटवर्क आहे. लोकांना भेटतो प्रत्येक घरात माझी बहीण, भाऊ आहेत. त्यामुळे मला घराघरातून प्रेम मिळते. परंतु डिजीटलमधून किती मुलांना प्रेम मिळते, हे मला माहीत नाही. तरी हे डिजीटलसारखे तंत्रज्ञान शिकले पाहिजे. परंतु आपला जनसंपर्क मात्र राहिला पाहिजे. घराघरात जाऊन आपण त्यांना भेटले पाहिजे गरिबांच्या झोपडीत जाऊन आपण त्याची सेवा केली पाहिजे. एखादी गरज असेल तर त्यांना ती मदत करणे गरजेचे आहे असेही राज्यपाल म्हणाले. रामायण काळात पुष्पक विमान होते की, नाही मला माहीत नाही. परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी आमच्या या देशात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी लागेल याची माहिती जगात भारताशिवाय कुठल्याही देशाने पहिल्यांदा सांगितले नाही, हा आमचा अभिमान असल्याचे राज्यपाल म्हणाले.


यावेळी 13 हजार 904 पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आले. यात 66 मुलींना पीएच. डी. प्रदान करण्यात आली मागील वर्षाच्या तुलनेत या यंदा एसएनडीटीमध्ये पीएच. डी. पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थीनीच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. तर 120 विजेत्यांमध्ये 63 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

हेही वाचा - 'माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना 'भारतरत्न' द्यावा लागेल'

Last Updated : Jan 18, 2020, 6:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details