महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर, राज्यपालांची घोषणा

अवकाळी पावसामुळे राज्यभरात लाखो हेक्टरपर्यंतचे शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही मदत जाहीर केली.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Nov 16, 2019, 5:17 PM IST

Updated : Nov 16, 2019, 7:31 PM IST

मुंबई - अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मदतीची घोषणा केली. ऑक्टोबर ते नोव्हेंरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


अवकाळी पावसामुळे राज्यातील खरीप पिकासहीत फळबागा आणि बारमाही पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. या दोन्ही प्रकारच्या पिकांना सरकारकडून मदत जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचे निर्देश राज्यपालांनी प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा -हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार मांडणार नागरिकत्व विधेयक

खरीप पिकांना दोन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ८ हजार तर, फळबागा आणि बारमाही पिकांना दोन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी १८ हजारांची मदत देण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे राज्यभरात लाखो हेक्टरपर्यंतचे शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही मदत जाहीर केली.

हेही वाचा -105 किंकाळ्या.. म्हणजे स्वत:चे षंढत्व लपविण्यासाठी सुरू झालेले उद्योग - उद्धव ठाकरे

या मदतीसोबतच अन्य घोषणा सुद्धा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना यावर्षीचा जमीन महसूल माफ करण्यात आला आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यापालांकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Last Updated : Nov 16, 2019, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details