मुंबई :मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन भारतीय प्रवाशांना पकडण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाने त्यांच्याकडून 24 कॅरेट सोन्याचे तीन बार जप्त केले आहेत. विमानतळावरील बॅगेज ट्रॉलीखाली सोन्याचे बार चिकटवून चोरटे तस्कर तस्करीचा प्रयत्न करत होते. सध्या कस्टम विभागाने सोने जप्त केले असून पुढील कारवाई सुरु आहे.
1.60 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त : माहितीनुसार, मुंबई एअर कस्टम्सने 3 भारतीय प्रवाशांना रोखले आणि त्यांच्याकडून 24 कॅरेट सोन्याचे 3 बार जप्त केले. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1.60 कोटी रुपये होती. तस्करांनी प्रवाशांनी सामान नेण्यासाठी वापरलेल्या विमानतळाच्या बॅगेज ट्रॉलीखाली सोन्याचे बार चिकटवून तस्करीचा प्रयत्न केला होता.
24 कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त : मार्चच्या सुरुवातीला, मुंबई विमानतळ सीमा शुल्क अधिकार्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 5 कोटी रुपयांचे 11 किलो सोने जप्त केले होते. पहिल्या घटनेत, दुबईवरून मुंबईला येणारा एक प्रवासी मोठ्या प्रमाणात सोने घेऊन येत आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर मुंबई कस्टम विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तस्कराला अटक केली. अटक करण्यात आलेला व्यक्ती यूएईचा रहिवासी होता. या व्यक्तीकडून सुमारे 9000 ग्रॅम वजनाची 24 कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली गेली होती. दुसऱ्या घटनेत, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी विमानतळावरील विश्रामगृहातील कर्मचार्यांकडून सुमारे 1.10 कोटी रुपये किमतीचे 2.1 किलो सोन्याचे मेण जप्त केले. मुंबईला येणाऱ्या करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांनी हे सोने विश्रामगृह कर्मचाऱ्यांना दिले होते.
सोन्याच्या तस्करांसाठी मुंबई ट्रान्झिट हब :कस्टम अधिकाऱ्यांनुसार, मौल्यवान धातूंची मोठी बाजारपेठ असल्याने सोन्याच्या तस्करांसाठी मुंबई हे ट्रान्झिट हब आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या इतर तीन मेट्रो शहरांतूनही सोन्याची आंतरराष्ट्रीय तस्करी केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हैदराबादमध्येही सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गतवर्षी येथून 55 किलो सोने जप्त केले होते. यावर्षी यात वाढ होऊन एकूण 124 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा :Action Against Motorists : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 13 दिवसात 72 लाखांचा दंड वसूल