मुंबई-प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यातील घुमटाला आणि दरवाजांना आता सोन्याची झळाळी मिळाली आहे. एका भाविकाने नाव सार्वजनिक न करण्याच्या अटीवर देणगी स्वरूपात हे दान दिले आहे. सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याने गाभारा लखलखून गेला आहे.
सिद्धिविनायकाच्या घुमटाला सोन्याची झळाळी - सिद्धिविनायकाच्या घुमटाला सोन्याची झळाळी
सिंदूर लेपनानंतर आज मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळी सोन्याचा मुलामा दिलेल्या घुमट आणि दरवाजाचे अनावरण करण्यात आले, अशी माहिती सिद्धिविनायक न्यासाचे कार्यकारी अधिकारी प्रियांका कुलकर्णी यांनी दिली आहे.

अंदाजे तीस ते पस्तीस किलो सोन्यापासून मंदिरातील दरवाजे आणि घुमटाला मुलामा देण्यात आला आहे. मंदिरातील उर्वरित दरवाजे तसेच बाहेरील परिसरात देखील देणगी स्वरूपात सोन्याचा मुलामा देऊन मंदिर परिसराला झळाळी देण्याची भाविकाची इच्छा असल्याचे प्रियांका यांनी सांगितले आहे.