लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी : अण्णा भाऊंना भारतरत्न द्या - जयंत पाटील - अण्णांना भारतरत्न द्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दिच्या निमित्ताने राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेकांनी अण्णांना भारतरत्न देण्याची मागणी केली. याबाबत घेतलेला आढावा.
अण्णा भाऊ साठे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दिच्या निमित्ताने राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेकांनी अण्णांना भारतरत्न देण्याची मागणी केली. याबाबत घेतलेला आढावा.
- सांगली - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज मन जागविण्याचे काम स्वतःच्या शाहिरीतून आणि प्रतिभेतून केले आहे. यामुळे त्यांंना भारत सरकारने 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करत मंत्री पाटील यांनी ही मागणी केली आहे.
- औंढा नागनाथ (हिंगोली) -सहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठेंच्या जनशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांना भारतरत्न (मरणोत्तर) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागी रिपब्लिकन सेनेने केली. पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली औंढा नागनाथ येथील तलावात जलसमाधी आंदोलनही करण्यात आले. तसेच या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्फत दिले.
- पुणे -साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अण्णाभाऊंनी लिहिलेल्या १०० किलो वजनाच्या पुस्तकांची ग्रंथतुला करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) गटनेत्या नगरसेविका सुनीता वाडेकर आणि रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर यांच्यावतीने बोपोडीतील सम्यक विहारात ही तुला झाली. यावेळी पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी 'रिपाइं'च्या परशुराम वाडेकर यांनी केंद्र सरकारकडे केली.