महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

10 जागा द्या अन्यथा स्वबळावर, महाराष्ट्र क्रांतीसेनेचा भाजपला इशारा - पक्षप्रमुख सुरेश पाटील मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला 10 जागा द्या अन्यथा स्वबळावर लढू, असा इशारा महाराष्ट्र क्रांतीसेना पक्षाने भाजपला दिला आहे. मराठा समाजाच्या नावाखाली पक्ष काढून मतविभाजन करणार नाही तर फक्त आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले. जर आम्हाला घटकपक्ष बनवून सन्मानाने 10 जागा दिल्या नाहीत, तर आम्ही 100 जागा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पत्रकारांसोबत बोलताना पक्षप्रमुख सुरेश पाटील

By

Published : Sep 10, 2019, 11:27 PM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला 10 जागा द्या अन्यथा स्वबळावर लढू, असा इशारा महाराष्ट्र क्रांतीसेना पक्षाने भाजपला दिला आहे. मराठा समाजाच्या नावाखाली पक्ष काढून मतविभाजन करणार नाही तर फक्त आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले. तसेच याचबरोबर भाजपने लक्ष द्यावे म्हणून महाराष्ट्र क्रांतीसेना पक्ष आटापिटा करत आहे. तर राजकीय पोळी भाजण्यासाठी पक्ष काय करतील याचा नेम नाही, हे या निमित्ताने समोर आले आहे.

10 जागा द्या अन्यथा स्वबळावर, महाराष्ट्र क्रांतीसेनेचा भाजपला इशारा

हेही वाचा -सोलापूर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार साळुंखे पाटील यांचा राजीनामा

महाराष्ट्र क्रांतीसेना पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळीसुद्धा महाराष्ट्र क्रांतीसेनेने 15 जागा लढवण्याचे ठरविले होते. मात्र, नंतर त्यांनी भाजप-शिवसेनेसोबत युती केली. तर आता विधानसभेसाठी त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच मुंबईतील ३६ जागांपैकी २० जागा ते लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -भाजपमध्ये गेल्यास उदयनराजेंना पोटनिवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजासाठी बरेच काही केले आहे. शरद पवार यांनीच मराठा समाजाला वंचित ठेवले. तसेच पवारांनी समाजासाठी कधीही हात पुढे केला नाही. शिवसेना आणि भाजपने आम्हाला सांगितले होते, विधानसभेला योग्य त्या जागा देऊ. मात्र, गेले आठ दिवस आम्ही पाठपुरावा करूनही योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून जर आम्हाला घटकपक्ष बनवून सन्मानाने 10 जागा दिल्या नाहीत, तर आम्ही 100 जागा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबर आतापर्यंत 18 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपल्या 12 उमेदवारांची नावेही त्यांनी घोषित केली.

ABOUT THE AUTHOR

...view details