मुंबई - आपल्या व प्रियकराच्या जीवाला घरच्यांकडून धोका असल्याने संरक्षण मिळावे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका पुण्याच्या १९ वर्षीय तरुणीने दाखल केली असून तिने तिच्या कुटुंबियातील सदस्यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
प्रेमी युगुलाच्या जीवाला कुटुंबाकडून धोका; प्रेयसीची कोर्टात धाव - pitistion
तरुणी ही सवर्ण जातीची असून तिचे दलित समाजातील तिचा मित्र असलेल्या विराज अवघडे या तरुणावर प्रेम आहे.
ही तरुणी सवर्ण जातीची असून तिचे दलित समाजातील विराज अवघडे या तरुणावर प्रेम आहे. या दोघांच्या प्रेमाला तरुणीच्या घरच्यांच्या विरोध असून या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तरुणीने या अगोदर आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे तरुणीने तिच्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे तरूणीला व तिच्या प्रियकराला कुटुंबियांपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी त्या तरुणीने तिच्या याचिकेत केली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.