मुंबई- गोवंडीच्या शिवाजी नगर भागात ५७ वर्षीय नराधमाने एका ८ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून तिच्या सोबत बळजबरी करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी रईस अहमद खान (वय ५७) या नराधमाला अटक केली आहे.
खाऊच्या आमिषाने अल्पवयीन मुलीसोबत ५७ वर्षीय नराधमाचे अश्लिल चाळे, अज्ञाताने व्हिडिओ करुन दाखविला पालकांना - abuse
खाऊचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या ५७ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
रईस हा या मुलीच्या शेजारीच राहायला होता. ओळखीचा असल्याने ही मुलगी त्याच्या घरी जात होती. त्याचाच गैरफायदा घेत खाऊचे आणि पैशाचे आमिष दाखवत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. ७ जूनला सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला खाऊचे आमिष दाखवून त्या नराधमाने घरी नेले आणि तिच्याशी अश्लिल चाळे करू लागला. एका व्यक्तीने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करून मुलीच्या घरी दाखवला. यावरून मुलीच्या घरच्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्ररीवरून नराधम रईसविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. ३५४ आणि पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.